महाराष्ट्रात ICICI बँकेच्या कार्यालयात GST पथकाची धडक; काय आहे संपूर्ण प्रकरण?

महाराष्ट्रात ICICI बँकेच्या कार्यालयात GST पथकाची धडक; काय आहे संपूर्ण प्रकरण?

खासगी क्षेत्रातील देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ICICI Bank च्या तीन कार्यालयावर काल जीएसटी पथक धडकले. या पथकातील अधिकाऱ्यांनी (GST Officers) येताच शोध मोहीम राबवली. त्यामुळे बँक जीएसटीच्या रडारवर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र जीएसटी अधिकाऱ्यांनी तपास अभियान राबविल्यानंतर बँकेने रात्री उशीरा या कारवाईची माहिती शेअर बाजाराला दिली. या माहितीनुसार, जीएसटी अधिकाऱ्यांनी राज्यातील त्यांच्या तीन कार्यालयात ही शोध मोहीम राबवली. जीएसटी विभागाकडून अजूनही तपास सुरू आहे. तर त्यांना आवश्यक तो डेटा देण्यात बँकेने सहकार्याची भूमिका घेतली आहे.

दुसर्‍या तिमाहीत जोरदार कमाई

महाराष्ट्र जीएसटी अधिनियम 2017 चे कलम 67(1) आणि (2) अंतर्गत जीएसटी अधिकाऱ्यांनी बँकेत ही कारवाई सुरू केली आहे. आयसीआयसीआय बँकेने दुसऱ्या तिमाहीत जोरदार मुसंडी मारली असतानाच जीएसीटीने तपास मोहीम राबवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बँकेने जुलै ते सप्टेंबर या दुसर्‍या तिमाहीत वार्षिक आधारावर 14.5 टक्के असा निव्वळ नफा नोंदवला आहे. या कालावधीत आयसीआयसीआय बँकेला 11,746 कोटींचा नफा झाला. अर्थात ही शोध मोहीम का राबवण्यात येत आहे? त्यामागील कारणं काय याचा खुलासा बँकेने केला नाही. बँकेने केवळ जीएसटी कार्यालयाकडून होणाऱ्या तपास मोहिमेला दुजोरा दिला आहे.

आज शेअर बाजारात दिसू शकतो परिणाम

बुधवारी झालेल्या या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारात दिसून शकतो. ICICI Bank Share वर आज काय परिणाम होतो हे आता काही मिनिटातच दिसून येईल. शेअर बाजारातील तज्ज्ञ सुद्धा या वृत्तानंतर बँकेच्या शेअरवर काय परिणाम होईल, याचा अंदाज बांधत आहेत. NYSE वर बँकेचा ADR 4 डिसेंबर रोजी 0.36 टक्क्यांपेक्षा अधिक बंद झाला. इंट्राडे उच्चांकात बँकेच्या शेअरला कमान सांभाळता आलेली नाही.

बुधवारच्या आकडेवारीनुसार, आयसीआयसीआय बँकेचा शेअरने हिरवा झेंडा फडकवला होता. बाजारात बँकेचा शेअर तेजीत होता. कालच्या व्यापारी सत्रात हा शेअर 1302.60 रुपयांवर उघडला. तो 1320 रुपयांपर्यंत उसळला. पण दुपारच्या सत्रात या शेअरला उसळी घेण्यासाठी पुरेसे बळ मिळाले नाही. हा शेअर 1315.60 रुपयांवर बंद झाला. काल तेजीच्या वेळी आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप 9.29 लाख कोटी रुपयांवर पोहचले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;