Maharashtra CM Swearing : महायुतीचा ग्रॅंड शपथविधी सोहळा, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची उपस्थिती, फडणवीस- अजितदादांच्या नावावर नवा रेकॉर्ड
महाराष्ट्रात आजपासून ‘देवेंद्र पर्वा’ला सुरुवात होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहेत. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
महायुतीकडून राज्यपालांना पत्र देत सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, हे एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलं नाही. संध्याकाळपर्यंत कळेल असं म्हटलं. रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात ‘वर्षा’ बंगल्या पाऊण तास चर्चा झाली. यावेळी गृहमंत्रिपदाबाबतही चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List