‘बीजेपी आया, मुंबई अभी मारवाडी का?’ मुजोर व्यापाऱ्याला मनसेनं चोप दिल्यानंतर राजकारण तापलं

‘बीजेपी आया, मुंबई अभी मारवाडी का?’ मुजोर व्यापाऱ्याला मनसेनं चोप दिल्यानंतर राजकारण तापलं

अभी बीजेपी आया है, तो अभी मराठी में नहीं तो मारवाडी में बात करने का…. हे शब्द आहेत मुंबईतल्या एका व्यापारीचे. भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढांच्या मलबार हिलमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला मनसेनं प्रसाद दिला. आधी मग्रृरी केल्यानंतर आपण असं बोललो त्याबद्दल माफी मागतो हे चोप मिळाल्यानंतर व्यापाऱ्याच्या ध्यानी आलं. भाजपनं महाराष्ट्र निवडणुकीत बटेंगे तो कटेंगेचा नारा देत एकजुटीचा संदेश दिला होता. मात्र त्याच मंगलप्रभात लोढांच्या मतदारसंघात एका व्यापाऱ्यानं आपल्याला मराठी आणि मारवाडीत वाटल्याची खंत महिलेनं व्यक्त केली.

ग्राहकांना मारवाडी भाषेत बोलण्यास सांगणाऱ्या दुकानदाराला मनसेने चोप दिल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  गिरगावच्या खेतवाडी भागातील एका महिलेने याबाबत मनसेकडे तक्रार केली होती. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आलं आहे त्यामुळे मारवाडीत बोललं पाहिजे असा दुकानदाराचा हट्ट होता.

काही दिवसांपूर्वी नाहूर रेल्वे स्थानकावर देखील अशीच एक घटना घडली होती. ज्यामध्ये मराठीत बोलल्याने एका रेल्वे कर्मचार्‍याने तिकीट देण्यास नकार दिला होता. हिंदीत बोला असं या कर्मचाऱ्याने जबरदस्ती केल्याने मराठी एकीकरण समितीने रेल्वे प्रशासनाकडे त्याची लेखी तक्रार केली होती. त्यानंतर त्याला तेथून हटण्यात आले होते.

दुसरीकडे ट्विटरवर गजाभाऊ नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन फडणवीसांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी दिलेली धमकीही चर्चेत आली आहे. गजाभाऊ नावाचा महाराष्ट्रातला व्यक्ती अमेरिकेत बसून भाजप नेत्यांवर वैयक्तिक चिखलफेक करतो असा आरोप करत आपण कंबोज यांनी जगात तो कुठेही असेल त्याला उचलून आणू अशी धमकी दिली आहे.

दरम्यान सोशल मीडियात यावरुन 60 दिवसांच्या अल्टिमेटमची चर्चा रंगते आहे. त्या 60 दिवसात गजाभाऊला उचललं नाहीतर बाप बदलण्याची भाषा सुरु झालीये. त्यावरुन ठाकरे गटाचे भास्कर जाधव सुद्धा गुवाहाटीला शिंदेंसोबत जाणार होते. या आरोपावर जाधवांनी मोहित कंबोज यांना आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं होतं. ती प्रतिक्रिया सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर आपण छोट्या माणसांवर बोलत नसल्याचं उत्तर मोहित कंबोज यांनी दिलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;