परीक्षेआधीच पेपर फुटला?, शिंदेंच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर!

परीक्षेआधीच पेपर फुटला?, शिंदेंच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर!

उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. आज भाजपकडून पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना यावेळी देण्यात आलं. उद्या सायंकाळी पाच वाजेचा वेळ राज्यपालांकडून शपथविधीसाठी देण्यात आला आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, या सरकारमध्ये देखील जुनाच पॅटर्न कायम राहणार असून राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत, मात्र दुसरीकडे गृहमंत्रिपद सोडण्यास भाजप देखील तयार नाही. त्यामुळे उद्या एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबतच काही मंत्री देखील शपथ घेणार आहेत. मात्र उद्या कोण-कोण शपथ घेणार हे मात्र अजूनही समोर आलेलं नाही, परंतु दुसरीकडे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार की नाही स्विकारणार हे अद्याप अस्पष्ट असताना शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्याची यादी समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई , गुलाबराव पाटील व दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;