Ajit Pawar : दिल्लीत गेले कशासाठी? राजधानीत मुक्काम कशासाठी? अजितदादांनी टाकलं सगळं सांगून…

Ajit Pawar : दिल्लीत गेले कशासाठी? राजधानीत मुक्काम कशासाठी? अजितदादांनी टाकलं सगळं सांगून…

राज्यात बहुमत मिळवूनही महायुतीने सरकार स्थापन करण्यासाठी मोठा कालावधी घेतला. मुख्यमंत्री दिल्लीतील बैठकीनंतर त्यांच्या मूळ दरे या गावी गेले. तिथून ते ठाण्याच्या घरी गेले. या दरम्यान महायुतीच्या बैठकी झाल्या नाहीत. तीनही पक्षाचे नेते एकत्र दिसले नाही. त्यावरून राज्यात वेगळ्याच चर्चा रंगल्या. शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. तर दुसरीकडे अजितदादांनी तातडीने दिल्ली गाठल्याने चर्चांना उधाण आले. अजितदादा अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आल्यानंतर राज्यात काहीतरी मोठं नाट्य घडतंय अशा चर्चा झाल्या. या सर्व प्रकरणावर आता अजितदादांनीच पडदा टाकला आहे. त्यांनी दिल्लीत मुक्काम कशासाठी ठोकला हे दिलखुलासपणे सांगून टाकले. त्यांनी जर-तरच्या चर्चांना आपल्या रोखठोक उत्तराने विराम दिला. काय म्हणाले अजितदादा?

काय केला खुलासा

दिल्लीवारीविषयी आज महायुतीच्या झालेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांनी खुलासा केला. “मी नवी दिल्लीत माझ्याकामासाठी गेलो होतो. मी कुणालाही भेटायला गेलो नव्हतो. माझी पत्नी सुनेत्रा यांना ११ जनपथ हा बंगला दिला आहे. मला घर नीटनेटकं लागतं. त्यामुळे मी आर्किटेक्टला घेऊन गेलो होतो. आमच्या केसेस चालू आहेत. त्याबद्दल वकिलांना कधी भेटलो नव्हतो. ते प्रफुल्ल पटेल बघायचे. तो विषय संपवा म्हणून वकिलांना भेटलो होतो. जवळच्या नातेवाईकांचं लग्न होतं. या तीन गोष्टीसाठी गेलो होतो. तसेच तिकडे गेल्यावर आराम करायला मिळतो. त्यामुळे मी अमित शाह यांना भेटायला गेलो होतो डोक्यातून काढून टाका.” असे अजितदादा म्हणाले. इतकेच नाही तर तुम्ही मात्र मला अमुक नेत्याने भेट नाकारली वगैरे बातम्या चालवल्या, असा टोला ही त्यांनी लगावला.

कोणी नाराज होणार नाही

पुढील पाच वर्षांत महायुती म्हणून काय करणार याची रुपरेषा अजितदादांनी थोडक्यात मांडली. या सरकारमध्ये कोणीही नाराज नसेल. रूसवे-फुगवे काढायचे काम पडणार नाही, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.
“आम्हाला अनुभव आहे. आम्ही राज्याचा विकास चांगला करू. राज्याला कसा फायदा देऊ हे पाहणार आहे. नैसर्गिक संकटं येत असतात. केंद्र सरकार सोबत होतं. पाच वर्ष हातात आहे. चांगलं बहुमत आहे. हा रूसला तो फुगला. याला सांभाळा त्याला सांभाळा वगैरे करण्याचं काम करण्याची गरज पडणार नाही. कोणी नाराज होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे ही जबाबदारी पार पाडतील. जी आश्वासने दिली ती पार पाडण्याचं काम करू. राज्याचा देशात नावलौकिक आहे. तो आम्ही देशात नेऊ. नंबर एकचं राज्य करू.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;