महायुतीच्या मंत्रिमंडळात असणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी स्वत: दिलं उत्तर 

महायुतीच्या मंत्रिमंडळात असणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी स्वत: दिलं उत्तर 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटल्यानंतर आज महायुतीच्या नेत्यांनी राजभवनात जावून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी एकत्रितपणे सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर या तीनही प्रमुख नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं. “एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली. त्यांच्या आमदारांचीही तीच विनंती आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे”, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याने एकनाथ शिंदे हे महायुतीच्या मंत्रिमंडळात असतील की नाही? याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “अरे बाबा, ते सांगितलं ना, तुम्हाला संध्याकाळी सांगतो ते. संध्याकाळी सांगतो ना. तुम्हाला तर एकदमच पाहिजे सगळं. देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले. त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आमचे सर्व महायुतीच्या आमदारांचादेखील जो आग्रह आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचा आदर करतो”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

‘इथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून…’

“आम्ही राज्यपालांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. राज्यपालांनी परवानगी दिली. उद्या साडेपाच वाजता आझाद मैदानात शपथविधी आहे. देवेंद्रजींनी निमंत्रण दिलं. आम्हीही देतो. अडीच वर्षापूर्वी इथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफरस केली होती. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि समर्थनाचं पत्र दिलं आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“आम्ही आधीच त्यांना पाठिंबा दिला होता. मोदी आणि अमित शाह असतील नड्डा असतील हे जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका आम्ही घेतली होती. गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता. मी मनमोकळेपणाने भूमिका स्पष्ट केली. खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय याचा आनंद आहे. आता पर्यंतच्या इतिहासात एवढं बहुमत मिळालं नव्हतं”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. “आमच्यात कोण मोठा कोण छोटा असं काही नव्हतं. आम्ही एकत्र काम करत होतो. सरकार सर्वसामान्यांसाठी असतं. आम्ही त्याचं पालन केलं. आम्ही विकास आणि योजना याची सांगड घातली”, असंदेखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;