मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच….; गटनेता निवडीच्या बैठकीत स्वत: फडणवीसांनीचं मोठं विधान
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवस चर्चेत होता. याचं उत्तर अखेर आज मिळालं आहे. भाजपच्या गटनेतापदाची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे, नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आपणच असणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. भाजपने तीन वेळा मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. त्यामुळे मी आभार मानतो, असं फडणवीसांनी म्हटलं. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील, हे आता निश्चित झालं आहे. याआधी 2014 आणि 2019 ला मुख्यमंत्री झाले होते. आता तिसऱ्यांदा ते उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर फडणवीस काय म्हणाले?
२०१९ रोजी जनतेचा कौल मिळाला होता. पण दुर्देवाने तो हिसकावून घेतला गेला. जनतेसोबत बेईमानी झाली. त्या इतिहासात जात नाही. आपल्याला नवी सुरुवात करत आहोत. अडीच वर्षात आपल्याला त्रास दिला,. आमदारांना त्रास दिला. अशा परिस्थित अभिमान आहे, या अडीच वर्षात एकही आमदार सोडून गेला नाही. सर्व आमदार नेते संघर्ष करत होते. त्यातूनच २०२२ मध्ये आपलं सरकार आलं. त्यातूनच आज आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं, असं फडणवीसांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री!
भाजपला १३२ आणि महायुतीला २३७ जागा मिळाल्या. हा महाराष्ट्रातील अभूतपूर्व यश आहे. मोदींचं आभार मानेल. बुथचा कार्यकर्ता म्हणून, वॉर्डाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. अशा व्यक्तीला तीन वेळा मुख्यमंत्रीपदावर बसवलं. एकदा ७२ तासांसाठी होतो. पण टेक्निकली मुख्यमंत्री होतो. हा पक्ष मोठा झाला. त्यांनी संधी दिली. मी मोदींचं आभार मानतो, असं फडणवीस म्हणालेत.
तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी नसतो. पुढची वाट अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. एक दिलाने सर्वांना सोबत घेऊन. एवढा मोठा कौल असल्यावर सर्व गोष्टी सर्वांच्या पूर्ण करता येत नाही. पण मोठा गोल घेऊन आपण राजकारणात आलो आहोत. पदासाठी किंवा कुणी तरी मोठं करावं यासाठी आलो नाही. चार गोष्टी मनासारख्या होतील. तर चार गोष्टी मनासारख्या होणार नाही. लार्जर इंट्रेस्टमध्ये काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ, असं फडणवीस म्हणालेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List