CM Devendra Fadnavis : एकही कार नाही, देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती किती?

CM Devendra Fadnavis : एकही कार नाही, देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती किती?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर किती दिवस मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम होता. बुधवारी मुंबईत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वात बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. उद्या 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. ते राज्याचे 21 वे मुख्यमंत्री असतील. त्यांनीच थोड्यावेळा पूर्वी केलेल्या खुलाशाप्रमाणे त्यांनी यापूर्वी तीनदा या पदावर काम केलेले आहे. त्यांच्याकडे इतकी आहे संपत्ती?

दक्षिण-पश्चिम नागपूरमधून दणदणीत विजय

महायुतीने या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला. इतकेच नाही तर भाजपाला अभूतपूर्व असा विजय मिळवून देण्यात फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी राज्यात भाजपाची लाट आणली. भूतो न भविष्यती असा निकाल राज्यात लागला. त्यात महायुतीने विजयाचे सर्व उच्चांक मोडीत काढले. फडणवीस यांनी निवडणुकीत शपथपत्र दाखल केले. त्यानुसार फडणवीस कुटुंबाकडे 13 कोटींची संपत्ती आहे.

फडणवीस हे 13 कोटींचे मालक

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात सादर केले. त्यात त्यांची संपत्ती आणि अन्य तपशील जाहीर केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 13 कोटी 27 लाख 47 हजार 728 रुपये इतकी संपत्ती आहे. फडणवीसांच्या आयटी रिटर्न फॉर्मनुसार 2023-24 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 79 लाख 30 हजार 402 रुपये इतके आहे. तर 2022-2023 मध्ये हा आकडा 92 लाख 48 हजार 094 रुपये इतके होते. फडणवीस यांनी पत्नी अमृता यांची संपत्ती 6 कोटी 96 लाख 92 हजार 748 रुपये तर मुलगीची संपत्ती 10 लाख 22 हजार 113 रुपये असल्याचे सांगीतले.

विविध योजनांमध्ये मोठी गुंतवणूक

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे 23 हजार 500 रुपये रोख रक्कम आहे. तर पत्नी अमृता यांच्याकडे 10 हजार रुपये रोख रक्कम आहे. फडणवीस यांच्या बँक खात्यात 2 लाख 28 हजार 760 रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाख 43 हजार 717 रुपये आहेत. फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत, विमा यात 20 लाख 70 हजार 607 रुपये गुंतवले आहेत. त्यांची पत्नी अमृता यांनी शेअर, म्यूचल फंड आदी मध्ये मिळून 5 कोटी 62 लाख 59 हजार 031 रुपये गुंतवणूक केली आहे. फडणवीस यांच्या NSS-बचत खात्यात 17 लाख रुपये जमा आहेत. तर एलआयसीमध्ये 3 लाखांची गुंतवणूक आहे.

फडणवीस यांच्याकडे सोने किती?

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 450 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याचे बाजारातील मूल्य 32 लाख 85 हजार इतके आहे. तर पत्नी अमृता यांच्याकडे 65 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. फडणवीस यांच्याकडे 4 कोटी 68 लाख 96 हजार रुपयांची अचल संपत्ती आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;