मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; कुणाला किती मंत्रिपदं मिळणार?

मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; कुणाला किती मंत्रिपदं मिळणार?

महायुतीच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. पाच आमदारांच्या मागे एक मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. महायुती सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्री असणार असल्याची माहिती आहे. आता या मंत्रिमडळात आपला समावेश असावा, यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तीनही पक्षातील नेत्यांनी लॉबिंग सुरु केलं आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर आज भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. याचवेळी मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.

खातेवाटपाचा फॉर्म्युला काय?

शिंदे सरकारमध्ये भाजपचे 10, शिवसेना शिंदे गटाचे 10 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री होते. आता यंदाच्या महायुती सरकारमधील खातेवाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. यात भाजपचे 20, शिवसेना शिंदे गटाचे 12, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री असतील, अशी माहिती आहे.

शिवसेना शिंदे गटाने या विधानसभा निवडणुकीत 57 जागा जिंकल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 13 ते 16 मंत्रिपदांची मागणी केली. यापैकी 13 मंत्रिपद मिळणार आहेत. त्यापैकी 7 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्रिपदं असणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 41 आमदार निवडणून आले आहेत. अजित पवारांनी भाजपला पाच आमदारांमागे एक मंत्रिपद मागितलं आहे. त्यानुसार त्यांना 5 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं मिळण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या महायुती सरकारमध्ये 43 मंत्री असण्याची शक्यता आहे.

महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार

महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते आज राजभवनवर जाणार आहेत. सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. तसंच भाजपची देखील आज महत्वाची बैठक होणार आहे. यात गटनेता निवडीबाबत मुख्यमंत्रिपदाबाबत आणि खातेवाटपाबाबतही चर्चा होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;