महायुती आज सत्तास्थापनेचा दावा करणार; गटनेता निवडीबाबत भाजपची बैठक
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले आहेत. असं असताना अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. किंबहुना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव देखील जाहीर झालेलं नाही. तर आता आज सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहेत. महायुतीचे महत्त्वाचे नेते सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांच्या निवासस्थानी जाणार आहेत. भाजपच्या गटनेतेपदी कोण असणार? याबाबतची स्पष्टता नाहीये. गटनेतापदी कोण असणार? याबाबत भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List