अजितदादा दिल्लीला का गेले? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया काय?; शंभुराज देसाई असं काय म्हणाले?

अजितदादा दिल्लीला का गेले? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया काय?; शंभुराज देसाई असं काय म्हणाले?

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे मूळ गाव दरे येथे गेले होते. तिथे मुक्काम ठोकल्यानंतर ते ठाण्यात परतले. त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे अजितदादा दिल्लीत दाखल झाले आहे. ते काही कामानिमित्त दिल्लीत आल्याचे सांगण्यात आले आहे. आज अजितदादा दिल्लीत दाखल झाल्यानंतर माध्यमांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. ते जमलंस तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. त्यावर शिंदे गटातून अशी पहिली प्रतिक्रिया आली आहे. शंभुराज देसाई यांनी याविषयी भाष्य केले आहे.

वर्षावर बैठक होणार

आज सर्व नेते आहेत ते शपथविधी स्थळावरती पाहणी साठी गेलेले आहेत. काल पण काहींनी पाहणी केली आज सर्व एकत्रित येऊन पाहणी करतायेत, आज कदाचित मुख्यमंत्री वर्षावर येऊन सर्वांचे बैठक देखील घेणार आहेत. ते आल्यानंतर आमची त्यांच्याशी भेट होईल त्यानंतर पुढील नियोजन करू. काल बावनकुळे अचानकच पाहणी करण्यासाठी गेले होते त्यांची माझी रात्री भेट झाली तेव्हा त्यांनी मला सांगीतलं की ठरवून झालं. महायुतीचे काहीच नेते पाहणी करायला गेले ना आम्ही गेलो नाही असे छोट्या गोष्टीवरून आमच्या नाराज होणार नाही, महायुती म्हणून एकत्र आम्ही सर्वत्र काम करतोय, अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांनी दिली.

कोणतीही नाराजी नाही

जो महायुती मधील वरिष्ठ नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल… त्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा राहील, असे एकनाथ शिंदे यांनी अगोदरच सांगितलेले आहे. आमच्याकडून कुठेही नाराजी नाही, असे शंभुराज देसाई यांनी सांगीतले. कोणतं खातं कोणाला या चर्चा माध्यमांमध्ये करायच्या नसतात. आमचं खातं कोणाला या माध्यमांमध्ये आणि डिबेट मध्ये चर्चा करून होत नाही. तर नेत्यांमध्ये चर्चा करून होत आहेत. शिवसेनेने सर्वाधिकार हे मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहेत. राष्ट्रवादीने अजित दादांना सर्वाधिकार दिले आहेत. सर्व पक्षातील नेतृत्वाचा विषय आहे की त्यांनी ते ठरवायचं आहे, असे देसाई म्हणाले.

अजित पवारांच्या दिल्लीवारीवर काय प्रतिक्रिया

अजित पवार दिल्लीला गेले याबद्दल दादा अधिक बोलू शकतात. पदांच्या कामासाठी गेलेत की दुसर्‍या कामासाठी गेलेत हे तुमचे प्रतिनिधी भेटून विचारू शकतात. सुनील तटकरे यांनी सकाळी सांगीतलं दादा त्यांच्या खाजगी भेटीसाठी दिल्लीमध्ये आले आहेत. आणि शक्य झालं तर अमित शाह यांना भेटणार आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दादांच्या दिल्लीवारीवर दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;