हिंमत असेल तर मणिपूर फाईल्स सिनेमा काढा…; संजय राऊतांचं नरेंद्र मोदींना आव्हान

हिंमत असेल तर मणिपूर फाईल्स सिनेमा काढा…; संजय राऊतांचं नरेंद्र मोदींना आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा पाहिला. त्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींना टोला लगवला आहे. उद्या संबल फाईल, मग महाराष्ट्र फाईल असा चित्रपट काढतील..आणि प्रेक्षक हेच बघायला पाठवतील. हिंमत असेल तर मणिपूर फाईल्स चित्रपट काढा. महाराष्ट्रात संविधानाची हत्या झाली त्यावर चित्रपट काढा, असं म्हणत राऊतांनी मोदींना आव्हान दिलं आहे.

ज्या पद्धतीने राज्यात सरकार स्थापनेचा गोंधळ सुरू आहे. तो एक प्रकारे अराजकता आहे. एवढं बहुमत मिळाल त्यावर लोकांचा विश्वास नाही. अनेक गावात फेरमतदान आणि मतमोजणीची मागणी होत आहे. माळशिरस तालुक्यात मरकडवडी गावात आज बॅलेटवर मतदान होत आहे. लोकांना ईव्हीएमवर संशय आहे. 10 दिवस झाले तरी हे बहुमताचे सरकार राज्यपालांकडे जात नाहीत. पण अस असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष शपथविधीची तारीख सांगतात. तिकडे मंडप घातला जातोय. आम्ही असतो तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असती, असं संजय राऊत म्हणालेत.

बातमी अपडेट होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;