शपथविधीसाठी मैदानाची पाहणी करायला एकाच पक्षाचे नेते कसे गेले?, देवेंद्र फडणवीस यांना मेसेज; शिंदे गटाच्या नेत्याची जाहीर नाराजी

शपथविधीसाठी मैदानाची पाहणी करायला एकाच पक्षाचे नेते कसे गेले?, देवेंद्र फडणवीस यांना मेसेज; शिंदे गटाच्या नेत्याची जाहीर नाराजी

येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भाजप हा विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र अजूनही गृहमंत्रिपदाचा पेच कायम आहे. एकीकडे एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे भाजपला देखील गृहमंत्रिपद हवं आहे, अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची देखील चर्चा आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर? 

5 तारखेला शपथविधी होणर आहे. मात्र त्यापूर्वी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. म्हणून मी ही पत्रकार परिषद घेत आहे. एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आज बैठक रद्द झाली वैगेरे अशा बातम्या येत आहेत. परंतु आज कोणतीही बैठक नव्हती. शिंदे साहेबांची तब्येत ठीक नाहीये, जो काही निर्णय होइल तो मान्य असेल हे त्यांनी आधीच सांगितले आहे, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, विरोधकांना अतिशय कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता विरोधक वेगवेगळी कारण शोधत आहेत. शपथविधीची तारीख ठरली आहे, मात्र तरी देखील काही गोष्टी विनाकारण बाहेर येत आहेत. काहीतरी तर्क काढायचा आणि बातमी बनवायची हे थांबलं पाहिजे. पक्षातल्या नेत्यांनी देखील कमेंट करणं थांबवा.   आमच्याकडून कोणताही उशीर झालेला नाही. ज्या वेळी बैठक ठरेल तेव्हा ते इकडे ही बसतील आणि दिल्लीलाही जातील असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

शपथविधी मैदानाच्या पाहाणीवरून केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी फडणवीसांना मेसेज केला, की महायुतीची सत्ता येत आहे. पण मैदानाची पहाणी करायला एकाच पक्षाचे नेते जातात. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. आम्हालाही कळवलं असत तर आम्हीही आलो असतो. याबाबत मी देवेंद्रजींना भेटायला जाणार होतो, मात्र ते आराम करत असल्याने भेट होऊ शकली नाही.  जनतेने गैरसमज करु नये. आम्ही शंभर टक्के एकत्र आहोत असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;