राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी वरिष्ठ नेत्याची निवड; तर आर. आर. आबांच्या लेकावर मोठी जबाबदारी
विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदाच्या निवडीबाबत बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ विधिमंडळ पक्ष नेता, गटनेता आणि मुख्य पतोदपदाबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी मुंब्रा- कळवा विधानसभा मतदारसंघाचे जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे. तर मुख्य प्रतोदपदी तासगाव- कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रोहित आर. आर. पाटील, प्रतोद म्हणून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जाणकर यांची निवड झाली. राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List