EVM Hacking : ईव्हीएम हॅक करण्याचा व्हिडिओ व्हायरल, निवडणूक आयोगाने म्हटले…

EVM Hacking : ईव्हीएम हॅक करण्याचा व्हिडिओ व्हायरल, निवडणूक आयोगाने म्हटले…

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महायुतीला मोठे यश मिळाले. महाविकास आघाडीला मोठा झटका बसला. त्यानंतर सर्वत्र ईव्हीएम हॅक करण्याची चर्चा सुरु झाली. महाविकास आघाडीकडूनही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर ईव्हीएम हॅक करण्यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला.

काय केला आहे दावा

अमेरिकेतील हॅकर सैयद शुजा याने अमेरिकेतील संरक्षण विभागाचे तंत्रज्ञान वापरुन ईव्हीएम हॅक करता येत असल्याचा दावा केला होता. ‘इंडिया टुडे’ने यासंदर्भात वृत्त दिले होते. सैयद शुजा याने ईव्हीएम हॅक करण्यासाठी 54 कोटींची मागणी केली होती. हॅकर व्हिडिओ कॉलिंगने व्यक्तीशी ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावरुन बोलत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे अखेर निवडणूक आयोगाने त्यावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्ट म्हटले…

महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओतील दावे खोटे आहेत. हा सर्व प्रकार खोटा आणि अप्रमाणित आहेत. ईव्हीएम टँपरफ्रूफ आहे. कोणत्याही नेटवर्कसोबत त्याला जोडत येत नाही. मुंबई सायबर पोलिसांनी या व्हिडिओतील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

काय आहे व्हिडिओत

व्हिडिओत अमेरिकन हॅकर सैयद शुजा असल्याचा दावा केला जात आहे. तो कोणाच्याही बाजुने निवडणूक निकाल लावू शकत असल्याचा दावा करत आहे. त्यासाठी त्याला व्हीव्हीपॅट मशिनचे नंबर मला हवेत. हे नंबर रिटेरिंग ऑफिसर देईल, असे तो म्हणतो. ईव्हीएम मशीन बंद असतानाही त्याचे ट्रन्समिशन करता येत असल्याचा दावा त्याने केला आहे. ६.५५ मिनिटांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. नेटकरी दोन्ही बाजूंनी दावे, प्रतिदावे करत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;