निवडणूक संपताच ‘लालपरी’चा प्रवास महागणार, एसटीचा इतके भाडेवाढीचा प्रस्ताव

निवडणूक संपताच ‘लालपरी’चा प्रवास महागणार, एसटीचा इतके भाडेवाढीचा प्रस्ताव

ST fare hike proposal: राज्यातील विधानसभा निवडणूक संपल्यानंतर जनतेला आता महागाईला सामोरे जाण्याची तयारी करावी लागणार आहे. ‘गाव ते एसटी’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणारे राज्य परिवहन महामंडळाने लालपरीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे कारण सांगत एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून १४.३ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच शंभर रुपयांच्या तिकिटांमागे १५ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

इतकी होणार भाडेवाढ

राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.महायुतीने राज्यभरातील महिलांना अर्ध्या भाड्यात प्रवास करण्याची सवलत दिली. निवडणुकीत महाविकास आघाडीने महिलांना मोफत एसटी प्रवास देण्याची घोषणा केली होती. आता नवीन सरकार अस्तित्वात येताच त्यांच्यासमोर एसटीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. १४.३ टक्के भाडेवाढीचे समर्थन करणारा प्रस्ताव महामंडळ प्रशासनाने तयार केला आहे. यापूर्वी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी एसटीच्या तिकीट दरात वाढ झाली होती. आता पुन्हा १२.३६ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव केला. त्यावर खलबते झाल्यानंतर १४.३ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला.

भाडेवाढीसाठी ही कारणे दिली

महामंडळ आर्थिक अडचणीत अडकले आहे. एसटी प्रशासनाला शासनाने दिलेल्या सवलतीवर पैसे खर्च करावे लागणार आहे. ते पैसे देखील आता एसटी प्रशासनकडे नाही आहेत. त्यामुळे ही भाडेवाढ करणे प्रशासनाला अनिर्वाय आहे. आता भाडेवाढीचा निर्णय घेतल्याशिवाय काही पर्याय नाही. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण झाले असत तर ही नामुष्की ओढवली नसती, असे काँग्रेस एसटी कर्मचारी संघटनेचे नेते श्रीरंग बर्गे यांनी म्हटले.

आता लक्ष नवीन सरकारकडे

एसटी महामंडळाने प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवला आहे. आता महायुतीचे सरकार तो मान्य करते की फेटळून लावते? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. सत्तेवर येताच जनतेला भाडेवाढीची भेट नवीन सरकार देणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;