एकनाथ शिंदे दरे गावात जाण्याचं खरं कारण काय?; शंभुराज देसाई यांनी सांगितली आतली बातमी

एकनाथ शिंदे दरे गावात जाण्याचं खरं कारण काय?; शंभुराज देसाई यांनी सांगितली आतली बातमी

दिल्लीहून परतल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडक त्यांच्या दरे या गावी गेले. त्यांचे गाव दुर्गम भागात आहेत. गावात पोहचल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. ते थेट त्यांच्या घरी गेले. शिंदे यांच्या या भूमिकेने राज्यात चर्चेचे पेव फुटले आहेत. एकनाथ शिंदे दरे गावात जाण्याचं खरं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याविषयी शंभुराज देसाई यांनी त्याविषयीची आतली बातमी सांगितली.

रोहित पवार यांना निराशा

महाराष्ट्राच्या जनतेने लोकशाही मार्गाने महायुतीला स्वीकारलेला आहे, महाविकास आघाडीला झिडकाडलं आहे, असे शंभुराज देसाई म्हणाले. रोहित पवार यांना यातून निराश आलेला आहे, त्यापोटी ते असे आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. रोहित पवार पाच वर्षे विधिमंडळात आहेत. हुंडाबळी चा कायदा देखील या ठिकाणी आहे त्याची कल्पना त्यांना नसेल त्यांची प्रत त्यांना पाठवतो. आमच्या घरात डोकावून बघू नये. महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष नेता कोण होणार त्याकडे लक्ष द्या. आमच्या मुला-मुलीकडेकडे लक्ष द्यायलाची तुम्हाला गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे का गेले गावी?

एकनाथ शिंदे हे अचानक गावी गेल्याने माध्यमात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमातील चर्चेवर आम्ही लक्ष देत नाही असा उत्तर दिले. तर एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी का गेले, यावर शंभुराज देसाई यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना थोडा त्रास होत आहे त्यामुळे आम्ही त्यांना आग्रह केला थोडा आराम करण्यासाठी म्हणून ते तिकडे गेले आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. एकनाथ शिंदे उद्या मुंबई परततील. कुठल्याही गोंधळात ते नाही. जे त्यांच्या पोटात ते त्यांच्या ओठात येते. एकनाथ शिंदे महायुती सोबत आहेत आणि महायुती जो निर्णय घेईल. त्यांच्याबरोबरच ते राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री यांच्याकडे गृहखात होतं. तसंच यावेळी व्हावे. मात्र याच्यावर केंद्रतील नेते अमित शहा यांच्यासोबत सल्ला घेऊन एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार निर्णय घेतील, असे देसाई म्हणाले. महायुती मध्ये मंत्री पदाच्या संख्या आणि खाते वाटप साठी कुठलाही रस्सीखेच आणि तणाव नाही. आमचे 63 आमदारांनी हा ठराव केलेला आहे पण त्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या बैठक आहे. त्यांचा नेता निवडीसाठी आणि तो झाल्यानंतर सरकार विस्तार प्रक्रियेला गती मिळेल असे त्यांनी सांगीतले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;