Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाऐवजी एकनाथ शिंदे यांनी मागितले हे मोठे पद, पक्षासाठी अमित शाह यांच्यापुढे केल्या या मागण्या

Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाऐवजी एकनाथ शिंदे यांनी मागितले हे मोठे पद, पक्षासाठी अमित शाह यांच्यापुढे केल्या या मागण्या

Eknath Shinde Meets Amit Shah: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर अजूनही सरकार स्थापन होऊ शकले नाही. महायुतीमधील तिन्ही पक्ष शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद अजूनही संपले नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाऐवजी मोठ्या मागण्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर ठेवल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे आपली बाजू मांडत विधानसभा अध्यक्षपद आणि 12 मंत्रिपदे मागितल्याचे वृत्त आहे. त्यातच गृह आणि अर्थ खातेही एकनाथ शिंदे यांनी हवे आहे. दरम्यान, मुंबईत महायुतीची होणारी बैठकही रद्द झाली आहे. एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी आपल्या गावी निघून गेले आहेत. आता ही बैठक 1 किंवा 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेसाठी या मागण्या

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह आणि अर्थखाते होते. ही खाती एकनाथ शिंदे यांना हवी आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदही त्यांना हवे आहे. परंतु भाजप यासाठी तयार नाही. त्यामुळे युतीमध्ये तडजोड कशी होणार? हा प्रश्न पडला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर पालकमंत्रीपदाचा विषय ठेवला आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी देताना शिवसेनेचा योग्य तो सन्मान ठेवण्याची मागणी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी सांगितले…

अमित शाह यांच्या भेटीबाबत एकनाथ शिंदे यांनी एएनआयशी संवाद साधला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते की, मी पत्रकार परिषदेत माझी भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीत मुख्यमंत्रीपदावरुन कोणतेही मतभेद नाही. लाडका भाऊ हे पद मला कोणत्याही पदापेक्षा मोठे आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आपणास मान्य राहणार असल्याचे आपण यापूर्वीच सांगितले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी गुरुवारी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक झाली होती. ही बैठक दोन तास चालली. त्या बैठकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जे.पी.नड्डा उपस्थित होते. या बैठकीपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्यानंतर शुक्रवारी हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे राज्यात विविध प्रकारची चर्चा सुरु झाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;