राज्यात पुन्हा देवेंद्रच… 5 डिसेंबरला ‘या’ ठिकाणी होणार नव्या सरकारचा शपथविधी; एकनाथ शिंदे, अजितदादांचं काय?

राज्यात पुन्हा देवेंद्रच… 5 डिसेंबरला ‘या’ ठिकाणी होणार नव्या सरकारचा शपथविधी; एकनाथ शिंदे, अजितदादांचं काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर 8 दिवस उलटले तरी सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना मुख्यमंत्री कोण याचा निर्णय अद्याप झालेला नाही. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महायुतीत आधी मुख्यमंत्रिपदावरुन आणि आता गृहमंत्रिपदावरुन वाद सुरु झाला आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याची तारीख निश्चित झाली आहे.

टीव्ही ९ मराठीला खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी मुंबईतील खास ठिकाणही निश्चित करण्यात आले आहे. मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आझाद मैदानात संध्याकाळी ५ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर येत्या २ किंवा ३ डिसेंबर रोजी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडेल. महायुतीच्या नव्या सरकारचा मेगा शपथविधी सोहळा पार हा ५ डिसेंबरला पार पडेल. त्यापूर्वी २ किंवा ३ डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी भाजप आमदारांची बैठकही पार पडेल. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांशी व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधला.

यावेळी सर्व आमदारांना येत्या 5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला सर्व आमदारांना उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या राज्यात सर्वत्र महायुतीचे सरकार येत असल्याने जल्लोष केला जाणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;