एकनाथ शिंदे दरेगावात, भरत गोगावले यांचे माध्यमांसमोर येत मंत्रिपदाचे संकेत, पाहा काय म्हणाले?

एकनाथ शिंदे दरेगावात, भरत गोगावले यांचे माध्यमांसमोर येत मंत्रिपदाचे संकेत, पाहा काय म्हणाले?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे मुंबईत आले. त्यांच्या भेटीसाठी आज शिवसेनेचे अनेक नेतेमंडळी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. यानंतर ते आज दुपारी दरेगावाला गेले. शिंदे यांचा पुढचा दोन दिवसांचा मुक्काम हा दरेगावातच असणार असल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आज शिवसेनेचे नेते भरत गोगावले आज माध्यमांसमोर आले. त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्याला मंत्रिपद मिळेल, असे संकेत दिले. “या वेळेस मला मंत्रिपद भेटेल, सर्व गणितं जुळून आणली आहेत”, असं सूचक वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं.

भरत गोगावले यांना यावेळी आगामी महापालिका निवडणुका महायुतीत लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही महायुतीमध्ये आहोत. पण वेगळं काही झालं तर आपली तयार असली पाहिजे. महायुतीमध्ये वेगळं लढावं, असं कुणाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही आमची तयारी पूर्ण ठेवली आहे. सर्व एकत्र लढतील”, असं भरत गोगावले म्हणाले. “उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना त्यांच्याकडे ज्या पद्धतीने गृहमंत्री पद होतं त्याच पद्धतीने गृहमंत्री पद आम्हाला मिळावं अशी आमची इच्छा आहे”, अशी देखील प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली.

एकनाथ शिंदे दरेगावात का गेले?

भरत गोगावले यांना यावेळी मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “शिंदे साहेब सर्व निर्णय घेतील. काही लोकांना संधी मिळेल. त्यामध्ये मलाही संधी असेल”, असंदेखील सूचक वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं. एकनाथ शिंदे अचानक दरेगावात का गेले? असादेखील प्रश्न भरत गोगावले यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “निवडणुकीच्या धावपळीत साहेबांनी आराम केला नाही म्हणून ते गावाला आरामासाठी गेले आहेत. साहेब आराम करायला गेले आहेत”, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट का घेतली?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जावून भेट घेतली. या भेटीवरही भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. “जितेंद्र आव्हाड त्यांचं काही काम मुख्यमंत्र्यांकडे घेऊन आले असतील. त्यांचं काम होतं. आम्ही त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारू” , असं भरत गोगावले म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;