‘भाजपात एकही लाडकी बहीण त्या पदासाठी योग्य नाही का?’, सुषमा अंधारेंनी पुन्हा डिवचलं

‘भाजपात एकही लाडकी बहीण त्या पदासाठी योग्य नाही का?’, सुषमा अंधारेंनी पुन्हा डिवचलं

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. गेल्या आठवड्यात या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक पक्ष मिळून राज्यात केवळ 50 जागाच जिंकता आल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला वीस जागा, काँग्रेस 16 तर सर्वात कमी जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निवडून आल्या.राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशातून सावरत महायुतीनं राज्यात जोरदार मुसंडी मारली. भाजप 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार 41जागांवर विजयी झाले.

मात्र स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील अजूनही महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये.समोर आलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा महायुती आणि शिवसेना शिंदे गटाला डिवचलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

विजयाची खात्री नसलेल्या शिंदे गटाच्या वाचाळ प्रवक्त्यानं म्हटलं होतं की जर 48 तासात सरकार स्थापन नाही झालं तर 26 नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल.आता 5 डिसेंबरला शपथविधी आहे.एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. 5 तारखेपर्यंत हे राज्य कोणाच्या भरवशावर चालणार आहे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे.लाडक्या बहि‍णींना सत्तेत वाटा मिळणार आहे की नाही? भारतीय जनता पार्टीमध्ये एकही महिला मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नाही का? असा सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान दुसरीकडे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. जर गृहमंत्रिपद मिळालं तरच ते उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार आहेत. अन्यथा शिवसेनेच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;