‘एकनाथ शिंदे अस्वस्त…’, दिल्लीतील महायुतीच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या बड्या नेत्याचा मोठा बॉम्ब

‘एकनाथ शिंदे अस्वस्त…’, दिल्लीतील महायुतीच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या बड्या नेत्याचा मोठा बॉम्ब

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र बहुमत मिळून देखील नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये, देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. मात्र अजून कोणाचंही नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाहीये. या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये गुरुवारी महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत? 

ज्या बातम्या येत आहेत, त्या माध्यमांसमोर मांडल्या जात आहेत. दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करणार असून, त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा निर्णय होणार आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली.  बैठक झाली पाहिजे पण बैठकीतून चांगला निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. केंद्रीय नेतृत्वाने जो काही निर्णय घेतला आहे ते केंद्रीय नेतृत्व आणि शिंदे साहेबांना माहीत आहे.

उपमुख्यमंत्री व्हायचं की नाही हे शिंदे साहेब ठरवतील. मी उपमुख्यमंत्री होणार यात तथ्य नाही. शिंदे साहेबांनी सरकारमध्ये रहावं अशी आमची इच्छा आहे. शिंदे साहेब अस्वस्थ आहेत पण ते नाराज नाहीत.  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आहे, गृहमंत्रिपदाबाबत कोणताही वाद नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीच्या विजयानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईव्हीएममध्ये समस्या होती तर महाविकास आघाडीचे आमदारही विजयी झाले असते असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;