Bachhu Kadu : एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवलं हेच खूप झालं, बच्चू कडू यांचा टोला कुणाला?

Bachhu Kadu : एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवलं हेच खूप झालं, बच्चू कडू यांचा टोला कुणाला?

विधानसभेतील दारूण पराभावानंतर बच्चू कडू यांनी आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत तातडीने बैठक घेतली. मुंबईतील वाय. बी.चव्हाण सेंटर येथे ही बैठक त्यांनी घेतली. संपूर्ण महाराष्ट्रातले जिल्हाप्रमुख आणि उमेदवार यांच्यासह 60 ते 70 लोकांची बैठक घेण्यात आली.
यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवलं हेच खूप झालं, असा चिमटा त्यांनी काढला. यावेळी त्यांनी अनेक विषयावर त्यांचे मत व्यक्त केले.

फडणवीसांना दिल्या शुभेच्छा

बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी चांगला कारभार करावा. शेतकर्‍यांची कर्ज माफीची घोषणा करावी. दिव्यांगांचे मानधनांमध्ये वाढ करावी. मला असे वाटते का एकंदरीत जशी लाडकी बहीण आहे त्याचे लाडके शेतकरी करता येईल का? लाडका मजूर करता येईल का? लाडका दिव्यांग करता येईल का? हा विचार करावा, असे कडू म्हणाले.

भाजपावर साधला निशाणा

भाजपा जेव्हा पूर्णपणे सत्तेत येते तेव्हा काय होते, यावर त्यांनी भाष्य केले. एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवले हेच मोठे झाले, असा टोला त्यांनी लगावला आणि भाजपावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे हे राज्यातच असतील ते केंद्रात जाणार नाहीत असे मत कडू यांनी व्यक्त केले. भाजपा त्यांना गृहमंत्री पद देणार नाही, असे संकेत त्यांनी दिले. भाजपाने त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं झाले. भाजपाने तेवढी तरी जाणीव ठेवली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

केंद्रातही मित्र पक्षांची गरज

चांगली गोष्ट आहे मला वाटतं आता या सगळ्या समीकरणात श्रीकांत शिंदे असेल किंवा प्रफुल पटेल असेल केंद्रामध्ये सुद्धा अस्थिरता निर्माण होऊ नये कदाचित केंद्रात जर गरज राहिली नसती तर आज राज्याचे चित्र वेगळं राहिलं असतं भाजपला केंद्रात पण गरज आहे ना मित्र पक्षाची मित्रपक्ष नाहीतर केंद्रात मग सत्ता ते पण अडचण येऊ शकतात, असे बच्चू कडू म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;