‘आम्ही आधी मुख्यमंत्री पदाबाबत बोललो नाही, कारण…’, काय म्हणाले अजितदादा

‘आम्ही आधी मुख्यमंत्री पदाबाबत बोललो नाही, कारण…’, काय म्हणाले अजितदादा

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेंस कायम असताना एनसीपीचे प्रमुख अजितदादा पवार यांनी बहुप्रतिक्षित एनडीएच्या बैठकीला हजर राहाण्यासाठी गुरुवारी दिल्ली गाठली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीचे तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे आणि अजित पवार गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी एनसीपीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.यावेळी ते म्हणाले की आम्ही राज्याला पुढे कसे न्यायचे, स्थानिक स्वराज्य संस्थात सत्ता कशी आणायची तसेच महिला आणि तरुणांना सशक्त कसे बनवायचे याच्या विषयावर चर्चाविनिमय आहे. लोकसभेत आम्हाला चांगले सर्मथन मिळले नाही, तरी आम्ही निराश झालो नाही. विधानसभेत चांगली कामगिरी करण्यासाठी मेहनत घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

ईव्हीएमबाबत टोला

ईव्हीएमवरील महाविकास आघाडीचे आरोप फेटाळत अजितदादा म्हणाले की यात काही तथ्य नाही. एनडीएच्या बैठकी आधी अजितदादा म्हणाले की त्यांना जेव्हा लोकसभेला जास्त जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम बरोबर होते. विधानसभेत निकाल निराळा लागला तर ईव्हीएमला दोष देणे बरोबर नाही, पंजाब,तेलंगणा आणि कर्नाटकात अनेक राज्यात विरोधक सत्तेत आहेत असा टोला अजितदादांनी यावेळी लगावला

 राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळवणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्याचा इरादा असल्याचे अजितदादांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता.यासाठी आम्हाला सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. आम्ही लढू आणि यश मिळवू. असली ( एनसीपी ) नकलीचा आता काही प्रश्न नाही. सर्वांना निवडणूक आयोगाने चिन्हं दिलेले आहे’.

मुख्यमंत्री कोण होणार ?

मुख्यमंत्री कोण होणार ? या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादा म्हणाले की आम्ही निवडणूकीपूर्वी केव्हाच या विषयावर चर्चा केली नाही की मुख्यमंत्री कोण होणार ? आमची प्राथमिकता सत्तेत येण्यावर होती. आम्ही आधी मुख्यमंत्री पदावर चर्चा यासाठी केली नाही, कारण यामुळे आमच्या निवडणूकांच्या निकालांवर परिणाम होऊ शकला असता.आता आम्ही भाजपा नेतृत्वाला भेटू आणि यावर चर्चा करु असेही ते म्हणाले.

सस्पेन्स कायम

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेन्स कायम आहे. तिन्ही पक्षांनी एकजूट दाखवत या प्रश्नावर शांतता पाळली आहे.एकीकडे भाजपाला मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता असताना इतर दोन्ही पार्टीना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागणार आहे.आधीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्या नुसारच हे होत आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे यांनी भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल ते आपल्याला मान्य असल्याचे म्हटलेले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;