विधानसभा निवडणुकीतील चौकारानंतर आता अजितदादांचा थेट षटकार, राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर

विधानसभा निवडणुकीतील चौकारानंतर आता अजितदादांचा थेट षटकार, राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तब्बल 230 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपनं 132 जागांवर विजय मिळवला, तर शिवसेना शिंदे गटानं 57 जागांवर विजय मिळवला. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं, ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे. लोकसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला फारसं यश मिळालं नव्हंत, मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटानं तब्बल 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीनंतर आता अजित पवार हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांची आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली.

या पत्रकार परिषदेपूर्वी दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार यांच्याकडून दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. लवकरात लवकर आपला पक्ष राष्ट्रीय बनेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. दिल्लीत आपला नक्की विजय होईल, राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा आपण पुन्हा राष्ट्रवादीला मिळून देऊ असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गट दिल्ली विधानसभेची निवडणूक लाढण्याची शक्यता आहे.

अजित पवारांचा ईव्हीएमवरून विरोधकांना खोचक टोला

दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी ईव्हीएमवरून विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीनंतर त्याच्यामध्ये घोटाळा झाला असं विरोधक म्हणतात असा टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;