मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादा अ‍ॅक्शन मोडमध्ये; भाकरी फिरवणार, कोणाला मिळणार डच्चू?

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादा अ‍ॅक्शन मोडमध्ये; भाकरी फिरवणार, कोणाला मिळणार डच्चू?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार यांनी ईव्हीएमवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच येत्या काळात भाकरी फिरवण्याचे संकेत देखील दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट दिल्लीची विधानसभा निवडणूक देखील लढवण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. त्यानंतर आता नवा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत आज दिल्लीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये महायुतीमधील तीनही प्रमुख पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यापूर्वी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार , प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये देखील एक बैठक झाली आहे.

‘आपल्या पार्टीचा देशभरात कसा विकास होईल, आपण अधिकाधिक जागा कशा जिंकू? महिलांना कशापद्धतीनं जास्तीत जास्त संधी देता येईल या सर्व विषयावर आम्ही चर्चा केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, डिसेंबरनंतर पक्षाचं एक राष्ट्रीय अधिवेशन देखील घेऊ. त्यामध्ये पक्षाला कसं पुढं न्यायचं, पुन्हा आपल्याला राष्ट्रीय पक्ष व्हायचं आहे, त्यासाठी काय करावं लागणार? यावर चर्चा होईल. तसेच जे चांगलं काम करत आहेत त्यांना आणखी जास्तीत जास्त संधी देण्यात येईल, जी पक्षासाठी कामं करणारी जुनी लोक आहेत, त्यांची जबाबदारी तरुणांकडे सोपवण्यात येईल, ज्यामुळे पक्षात तरुणांची फळी निर्माण होईल. महिलांना देखील संधी देण्यात येईल, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षांतर्गत भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान यावेळी बोलताना ईव्हीएमच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार निशाणा साधाला.  लोकसभेत आम्हाला जेव्हा कमी मतदान झालं तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं. विधानसभेत आम्हाला बहुमत मिळालं मग त्याचवेळी नेमका ईव्हीएममध्ये घोटाळा कसा झाला असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;