Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी, महिलेला घेतलं ताब्यात

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी, महिलेला घेतलं ताब्यात

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात काल रात्री एक फोन आला. हा फोन आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली. कारण फोन करणाऱ्या व्यक्तीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. त्या कॉलरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची धमकी दिली. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा हा फोन आला. मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. यामध्ये कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचा दावा करण्यात येतोय. या कॉल प्रकरणी शितल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासात महिला मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याच कळतय. स्टँडर्ड प्रोसिजरनुसार पोलिसांकडून तपास सुरु आहे. या महिलेच वय 34 वर्ष असल्याच समजतय. महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मागच्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. या दरम्यान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा हा फोन कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सध्या कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाकडे?

महाराष्ट्रात सध्या राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील. यात कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;