Eknath Shinde Press Conference – सावत्र भावांना महिलांनी बाजूला ठेवलं – एकनाथ शिंदेंचा मविआच्या नेत्यांना टोला

Eknath Shinde Press Conference – सावत्र भावांना महिलांनी बाजूला ठेवलं – एकनाथ शिंदेंचा मविआच्या नेत्यांना टोला

शिवसेनेचे नेते, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सध्या कार्यभार पाहणारे, एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांसमोर येऊन पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेबाबत दुपारपासूनच सस्पेन्स वाढला होता. अखेर यावेळी त्यांनी उपस्थितांशी आणि माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली . यावेळी त्यांनी गेल्या अडीच वर्षांच्या कामाचा आढावा घेतानाच विकासकामांची यादी वाचून दाखवली. तसेच लाडक्या बहीण योजनेचा दाखला देत लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख झाली आहे असे सांगत त्याबद्दल समाधान व्यक्त केलं.

तसेच या योजनेस नावं ठेवणाऱ्या, या योजनेवर टीका करणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी त्यांची जागा दाखवली असे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला. सावत्र भावांना लाडक्या बहिणींनी बाजूला ठेवलं, असं सांगत त्यांनी महायुतीला मिळालेल्या विजयाचं आणि मविआच्या दारूण पराभवाचं कारण पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

राज्य आणि केंद्र सरकार समविचारी असते तेव्हा राज्याच्या प्रगतीचा वेग गतिमान होतो. त्यामुळे अडीच वर्षाच्या काळात मी समाधानी आहे. मी काही डिटेल्समध्ये जाणार नाही. पण आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. आतापर्यंतच्या सरकारने असे निर्णय घेतले नव्हते. आम्ही सर्वांबाबत निर्णय घेतले. कुणाचेही प्रश्न ठेवले नाही. सिंचनाच्या १२४ प्रकल्पांना आम्ही मान्यता दिल्या, असे एकनाथ शिंदे म्हणाले. पूर्वी चार प्रकल्पांना मान्यता मिळायच्या, राज्याच्या प्रगतीचा वेग मोठा होता. आम्ही राज्य एक नंबरला नेण्याचं काम केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्य एक नंबरला होतं. महाविकास आघाडीच्या काळात तीन नंबरला होतं. आम्ही सहा महिन्यात नंबर वनला आणलं असंही शिंदे यांनी सांगितलं.

आम्ही जे काम केलं, जे निर्णय घेतले आणि सकारात्मकता दाखवली, त्यामुळेच या निवडणुकीत (आमच्यावर) मतांचा वर्षाव झाला. लाडक्या बहिणीचा सख्खा लाडका भाऊ ही माझी ओळख झाली. बाकीचे सावत्र भाऊ झाले. मी म्हटलं सावत्र भावांना लक्षात ठेवा,. महिलांनी त्यांना बाजूला ठेवलं,अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मी समाधानी आहे. माझी लाडका भाऊ ही ओळख ही मोठी आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

आम्ही रडणारे नाही लढणारे

आम्ही नाराज होऊन रडणारे नाही, लढणारे आहोत. लढून काम करणारे आहोत. एवढा मोठा विजय मिळाला. हा विजय आतापर्यंतच्या विजयात ऐतिहासिक गणना होते. याचं कारण एवढं की आम्ही जीव तोडून मेहनत केली. जीव तोडून निर्णय घेतले. लोकांमध्ये गेलो. आम्ही जे काही काम केलं ते मनापासून केलं. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. मला काय मिळालं, त्या पेक्षा जनतेला काय मिळालं हा आमचा उद्देश होता. लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना फायदा झाला हे महत्त्वाचं आहे, असं त्यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राजभवनात राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;