महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? पत्रकार परिषदेपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या जवळच्या माणसानं टाकला बॉम्ब!

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? पत्रकार परिषदेपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या जवळच्या माणसानं टाकला बॉम्ब!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीचे तब्बल 230 उमेदवार विजयी झाले. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचे केवळ 50 उमेदवार विजयी झाले. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही एका पक्षाला किमान 29 जागा आवश्यक असतात मात्र महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांपैकी एकालाही 29 जागा मिळवता आलेल्या नाहीत. राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, मात्र आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात थोड्याच वेळात महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे. एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काय घडणार याबाबत मला कल्पाना नाही, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी पत्रकार परिषद आयोजित केली याचा अर्थ त्यामध्ये निश्चित काहीतरी बातमी असणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार? उपमुख्यमंत्री कोण होणार? केंद्रातून ऑफर कोणाला आली? या सर्व प्रश्नांची उत्तर आज कदाचीत मुख्यमंत्री देतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी राज्यात पुन्हा भूकंप होईल का? अशी स्थिती आहे का? असा प्रश्नही यावेळी संजय शिरसाट यांना विचारण्यात आला. यावेळी बोलताना शिरसाट यांनी म्हटलं की, काही सांगता येत नाही, एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री जेव्हा त्यांच्या दाढीवरून हात फिरवतात त्यावेळी निश्चित काही तरी घडतं असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. मुख्यमंत्री निवडीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.  या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;