एकनाथ शिंदे बॉम्ब टाकणार की बॅकफूटवर जाणार? थोड्याच वेळात मांडणार भूमिका; अवघ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे

एकनाथ शिंदे बॉम्ब टाकणार की बॅकफूटवर जाणार? थोड्याच वेळात मांडणार भूमिका; अवघ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे

विधानसभा निवडणुकीमध्ये  राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडील मोठा धक्का बसला आहे. तब्बल 230 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीला मात्र तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या, महाविकास आघाडीच्या वाट्याला मोठा पराभव आला आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक 132 जागा जिंकत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर शिवसेना शिंदे गटला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार?

मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात यावं अशी मागणी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान थोड्याच वेळात आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते आपली मुख्यमंत्रिपदाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या पत्रकार परिषदेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.  एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडणार? मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार की, काही वेगळा निर्णय घेणार हे पहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजप हा या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं राज्यात तब्बल 132 जागा जिंकल्या एकटा भाजप पक्ष बहुमतापासून आता अवघ्या काही जागा दूर आहेत. त्यात काही अपक्ष उमेदवारांनी देखील भाजपला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे काही अपक्ष उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांना देखील पाठिंबा दिला आहे. मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचं संख्याबळ भाजपच्या तुलनेत खूप कमी आहे, त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;