मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रात जाणार? शिवसेनेच्या बड्या नेत्याचे महत्वाचे वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रात जाणार? शिवसेनेच्या बड्या नेत्याचे महत्वाचे वक्तव्य

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. १३२ जागा घेऊन भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्याचवेळी शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे राज्यात उपमुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना आपले मत मांडले.

श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाही?

आमदार संजय शिरसाट म्हणाले, श्रीकांत शिंदे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. ते राज्यात येणार नाहीत. श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाही. या बातम्या खोट्या आहेत. तसेच माझ्याकडून मंत्री पदासाठी कुठलीही लॉबिंग होत नाही. मी केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले, संजय राऊत यांनी आमची जास्त चिंता करू नये.आम्ही सक्षम आहोत. त्यांनी सिल्वर ओकला जावे. कांग्रेस सोबत जाोवून तुमचे काय हाल झाले ते पहिले आहे.

एकनाथ शिंदे केंद्रात जाणार नाही?

राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? या विषयावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप कुणालाही दिल्लीतील नेत्यांचा फोन आला नाही. फोन कधी आणि कुणाला येणार हे अद्याप सांगता येणार नाही. तसेच आमचे नेते एकनाथ शिंदे केंद्रात जाणार नाही. या संदर्भातील बातम्यांमध्ये तथ्य नाही. शिंदे साहेबांना महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करायचे आहे.

राज्यातील जनतेचा विकास कारायचा आहे. त्यांचा स्वभाव पाहिल्यास मला नाही वाटत ते केंद्रात जातील. परंतु त्यांनी काय करायचे हा त्यांचा निर्णय आहे. त्यांच्या स्वत:चा निर्णय आम्हाला बंधनकारक आहे. थोडी वाट पाहा. ते कोणत्या वेळी काय निर्णय घेतात, त्याचे गणित त्यांच्याकडे परफेक्ट असते. योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळेच योग्य वेळी योग्य गेम ते करतात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;