चक्रीवादळाचे संकट, राज्यात पुढील पाच दिवस थंडीचा कडाका, मुंबईतील तापमान घसरले, पुण्यात हुडहुडी

चक्रीवादळाचे संकट, राज्यात पुढील पाच दिवस थंडीचा कडाका, मुंबईतील तापमान घसरले, पुण्यात हुडहुडी

Temperatures Drop in Maharashtra: राज्यातील वातावरणात गेल्या दोन, तीन दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील पुणे, मुंबईसह अनेक शहरांचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पुण्याचे तापमान दहा अंशावर आले आहे. मुंबईतील तापमानात विक्रमी घसरण झाली आहे. बंगालचा उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील पाच दिवस थंडीचा कडाका राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. बंगालच्या उपसागरात फेंगल हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. काही शहराचे तापमान ८ ते १० डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. परभणीत निच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाने ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या बदलामुळे राज्यात पाच दिवस थंडी राहणार आहे. पुण्याचे तापमान दहा अंशावर तर मुंबईचे तापमान १६ अंशावर आले आहे.

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे शाळांना सुट्टी

दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचे रुपातंर चक्रीवादळात होणार आहे. ‘फेंगल’ नावाच्या या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी मयिलादुथुरई, तिरुवरूर, नागपट्टिनम, चेन्नई, तिरुवल्लुर, कांचीपूरम, चेंगलपेट आणि कडलोर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे प्रशासनाने २७ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. तसेच २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात पाच दिवस थंडी

पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होणार आहे. यामुळे या ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ८० किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. २७ नोव्हेंबर रोजी निर्माण होणारे हे चक्रीवादळ येत्या दोन दिवसांत श्रीलंकेचा किनारा ओलांडून तामिळनाडूच्या दिशेने जाणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होणार आहे. राज्यात थंडीचा कडाका पाच दिवस असणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;