26/11 Mumbai Attack: 10 दहशतवादी, ताबडतोब फायरिंग, 60 तासांची दहशत अन् 166 लोकांचा मृत्यू; त्या काळ्या दिवसाची कहाणी
एकीकडे 26 नोव्हेंबर हा 'संविधान दिवस' म्हणून ओळखला जातो, तर दुसरीकडे या तारखेशी निगडीत एक असा काळा दिवस आहे, जो क्वचितच कोणी विसरू शकेल. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेला 16 वर्षं उलटली तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात घटनेच्या कटू आठवणी जिवंत आहेत.
या दहशतवादी हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांनी आपले प्राण गमावले होते. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. देशातील सर्वांत सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं.
पाकिस्तानातील कराची इथून 10 दहशतवादी बोटीने मुंबईला रवाना झाले होते. समुद्रमार्गेच ते मुंबईत दाखल झाले होते. भारतीय नौदलाला चकवा देण्यासाठी त्यांनी वाटेत एका भारतीय बोटीचं अपहरण केलं होतं. त्या बोटीवरील सर्व लोकांना त्यांनी ठार केलं होतं.
या बोटीचा वापर करून ते रात्री आठच्या सुमारास कुलाब्याजवळील मच्छी मार्केटमध्ये उतरले. त्यावेळी स्थानिक मच्छिमारांनाही त्यांच्यावर संशय आला होता. याबाबत पोलिसांना कळवलं असता त्यांनी सुरुवातीला त्याकडे गांभीर्याने पाहिलं नव्हतं.
लष्कर-ए-तैयबाच्या सशस्त्र दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. सलग चार दिवस हा हल्ला सुरू होता आणि त्यात 160 हून अधिक लोक मारले गेले. 26 नोव्हेंबर 2008 च्या या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List