विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे शिवसेनेची ‘फिल्डिंग’? विधिमंडळ सचिवांच्या भेटीने चर्चांना उधाण, नियम सांगतो काय?

विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे शिवसेनेची ‘फिल्डिंग’? विधिमंडळ सचिवांच्या भेटीने चर्चांना उधाण, नियम सांगतो काय?

विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री कोण ही चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते पदी कुणाची वर्णी लागणार याविषयीची उत्सुकता आहे. कारण यावेळी नियमांकडे बोट दाखवून महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला हे पद मिळणार नसल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने पक्षाचे विधिमंडळ गटनेते निवडल्यानंतर आता उद्धव सेनेने सुद्धा गटनेतेपदाची निवड केली आहे. आता उद्धव सेनेने विरोधी पक्षनेते पदासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विधिमंडळ गटनेतेपदी भास्कर जाधव

काल उद्धव सेनेच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक झाली. या बैठकीत भास्कर जाधव यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. तर सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा प्रतोदपदी निुयक्ती करण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर सभागृह नेता म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर उद्धव सेना आमदारांच्या शिष्टमंडळाने विधिमंडळ सचिवांची भेट घेतली. या नवीन निवडीबाबतचे पत्र त्यांनी सचिवांना भेट देऊन दिले.

विरोधी पक्षनेते पदासाठी फिल्डिंग?

उद्धव सेनेचे विधिमंडळ गटनेते भास्कर जाधव यांनी या भेटीची माहिती दिली. त्यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी काय नियम आहे, त्याचे निकष काय? याविषयीची सचिवांसोबत चर्चा केल्याची माहिती दिली. या पदासाठी किती संख्याबळ पुरेसे आहे. त्याचा नियम काय? कायदा काय सांगतो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या प्रश्नांवर सचिवांचा गोंधळ उडाल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला. एका नियमानुसार, विरोधी पक्षनेतेपदासाठी 29 आमदारांचं संख्याबळ लागत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावर बोलताना आमच्याकडे सध्या 20 आमदार आहेत. महाविकास आघाडीत आपल्याकडेच संख्याबळ जास्त असल्याचे ते म्हणाले. आता विरोधी पक्ष नेतेपदासाठी काय नियम आहे, काय प्रक्रिया आहे, यावर सविस्तर चर्चा करू असे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही, असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत. पण याविषयीचा नियम काय आहे, कायदा काय आहे आणि संख्याबळानुसार या नियमात काही बदल संभवतो का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाही. त्याविषयी आता उद्धव सेने मंथन करत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा विरोधी पक्षांना योग्य सन्मान देण्याची भाषा करण्यात आली आहे. त्यामुळे या पदावर उद्धव सेनेचा शिलेदार बसणार का हे लवकरच समोर येईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;