एकनाथ शिंदेंचे सत्तास्थापनेपूर्वी ट्वीट, शिवसैनिकांना महत्त्वाचे आवाहन

एकनाथ शिंदेंचे सत्तास्थापनेपूर्वी ट्वीट, शिवसैनिकांना महत्त्वाचे आवाहन

Maharashtra Government Formation : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी झालेल्या लढतीत महायुतीला बहुमत मिळाले. मात्र अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच आता मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. तर दुसरीकडे भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत. तसेच अजित पवार गटानेही मुख्यमंत्रि‍पदावर दावा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सध्या मुंबईसह दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे उद्या सकाळी महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याचे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी काही तासांपूर्वी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शिवसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. तसेच सरकार स्थापनेबद्दलही मोठा दावा केला आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असे एकनाथ शिंदेंनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

महायुतीला स्पष्ट बहुमत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. सध्या महायुतीच्या गोटात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

अमित शाह आज मुंबईत येण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीला गेले होते. आज दिल्लीत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा होणार आहे. अमित शाह हे आज मुंबईत येणार असल्याचे बोललं जात आहे. अमित शाह निरीक्षक म्हणून उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीतच आज एक पत्रकार परिषद होणार आहे. यात अमित शाह हे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याची घोषणा करणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;