Raj Thackeray : …तर आज चित्र वेगळं असतं, राज ठाकरेंच्या भूमिकेवर संजय राऊतांचा घणाघात

Raj Thackeray : …तर आज चित्र वेगळं असतं, राज ठाकरेंच्या भूमिकेवर संजय राऊतांचा घणाघात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला आहे. या निवडणुकीत हाराकिरी झाल्याने त्यांची किरकिर वाढल्याचा आरोप महायुतीमधून करण्यात येत आहे. तर हा निकाल मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेसनी भूमिका घेतली आहे. इतका एकांगी निकाल लागल्याने हा ईव्हीएमचा निकाल असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

चंद्रचूड यांच्यावर टीका

निकालाच्या दिवशी पहिल्या दोन तासात बरोबरची लढाई होती. मात्र हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान होऊ दिलं.याला जबाबदार कोण असेल तर सुप्रीम कोर्टचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड हे आहेत. अडीच वर्ष त्यांनी निर्णय दिला नाही. घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाही त्यांना माफ करणार नाही. आमदारांमध्ये पक्ष बदलण्याची भीती राहिली नाही. चंद्रचूड यांचं नाव काळ्या अक्षराने लिहिले जाईल.

जनतेच्या न्यालायलात न्याय विकत घेण्यात आला. आम्ही लढाई अर्धवट सोडणार नाही. मतविभागणी झाली. हा मोठा फटका आम्हाला बसला. वंचित, आणि मनसे ह्यांचे उमेदवार उभे केले होते, असा आरोप त्यांनी केला. गुजरातची लॉबी मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवणार आहे.
गुजरातमध्ये त्यांनी शपथविधी घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांच्यावर घणाघात

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे उमेदवार विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवले होते. पण त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. जनतेने त्यांना जनादेश नाकारला. लोकसभेत राज ठाकरे यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा दिला होता. तर यावेळी मनसेने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यावर आता संजय राऊत यांनी तोंडसुख घेतले. राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर आज चित्र वेगळं असतं, असे ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;