काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त 15 जागा, पटोलेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त 15 जागा, पटोलेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या केवळ 45 जागा निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र महायुतीचा ऐतिहासिक असा विजय झाला आहे. तब्बल 230 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं राज्यात 131 जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. काँग्रेसला राज्यात केवळ 15 च जागा मिळाल्या आहेत. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले पटोले? 

हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि आमच्यासाठी अनपेक्षित आहे.  याची चौकशी केली जाईल याचे मी समर्थन करतो. आता सत्तेत लोक आहेत ते म्हणतात की लाडक्या बहिणींनी आम्हाला तारलं, त्यामुळे त्यांनी आता लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावेत. महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी जी अश्वासनं दिली आहेत, त्याची त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी त्यांनी काम करावं. मोदीजी म्हणाले होते, आमचे सरकार धुतल्या तांदळासारखे आहे. हे सरकार स्वच्छ असावं ही आमची भूमिका आहे, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, आम्हाला ईव्हीएम वर चर्चा करायची नाही, मात्र आम्ही याचा अभ्यास करू. पत्रकारांना ईव्हीएमवर शंका असेल आम्हाला नाही. फडणवीस, शिंदे यांच्या सभेला गर्दी जमत नव्हती, त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हीच चर्चा सुरू आहे, हे नेमकं कसं घडलं? वाद आमच्यापेक्षा जास्त महायुतीमध्ये होता, पण सोशल मीडियावर आमची जास्त चर्चा झाली, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;