Maharashtra Assembly Election Results : राज्यात पुन्हा दोन उपमुख्यमंत्री? मुख्यमंत्री कोणाचा, समोर आली सर्वात मोठी बातमी

Maharashtra Assembly Election Results : राज्यात पुन्हा दोन उपमुख्यमंत्री? मुख्यमंत्री कोणाचा, समोर आली सर्वात मोठी बातमी

राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडं लागलं होतं. अखेर निकाल समोर आला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 133 जागांसह भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीमधील अन्य दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे विधानसभेत विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ देखील महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाकडे नाहीये. विरोधी पक्षनेतेपदासाठी कुठल्याही एका पक्षाला 29 जागांची आवश्यकता आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 15, शिवसेना ठाकरे गटाला 20 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ 10 जागा मिळाल्या आहेत. महायुतीनं 231 जागांवर विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला राज्यात एकूण 45 जागाच जिंकता आल्या आहेत.

दरम्यान राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे. मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार? पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की भाजपचा मुख्यमंत्री होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  त्यातच महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा दोन उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न कायम राहणार आहे. तर मुख्यमंत्री हा भाजपचा होणार असल्याचं समोर येत आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की आम्ही तीन्ही पक्ष याबाबत बसून निर्णय घेऊ

दरम्यान नव्या सरकारच्या शपथविधीबाबत देखील महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे नव्या सरकारचा शपथविधी हा सोमवारी किंवा मंगळवारी होणार आहे. शिवाजी पार्क किंवा वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. महायुतीमधील कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;