निकालाने तोंडचे पाणी पळवले… हॉटेल पॉलिटिक्स, एअर लिफ्टिंग आणि घोडेबाजाराला लगाम

निकालाने तोंडचे पाणी पळवले… हॉटेल पॉलिटिक्स, एअर लिफ्टिंग आणि घोडेबाजाराला लगाम

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनाने महायुतीचा भरभरून मतदान केले. महायुतीने संपूर्ण राज्यात मोठी आघाडी घेतली. त्यात भाजपा हा 127 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिंदे सेना 56 आणि अजितदादांची राष्ट्रवादी 38 जागांवर पुढे आहे. हा मोठा उलटफेर आहे. एक्झिट पोलने महायुतीला जो कौल दिला होता. त्यापेक्षा रेकॉर्डब्रेक आघाडी महायुतीने घेतली आहे. तर महाविकास आघाडी केवळ 50 जागांवर आडवी झाली आहे. त्यामुळे यावेळी काय झाडी आणी काय डोंगरचे चित्र, हॉटेल पॉलिटिक्सलाच नाही तर घोडेबाजाराला पण लगाम लागला.

हॉटेल पॉलिटिक्सला ब्रेक

गेल्या काही वर्षांपासून राज्यातच नाही तर देशातील राजकारणाला हॉटेल पॉलिटिक्सचे वेड लागले आहे. 2019 मध्ये भाजप शिवसेना फाटाफूट झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. कोरोना काळ संपताच या सरकारला भाजपाने सुरूंग लावला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वात शिवसेनेतील मोठा गट बाहेर पडला. सुरूवातीला हा गट सुरत नंतर गुवाहाटी आणि सरते शेवटी गोव्यात राहिला. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी मुंबईत दाखल झाला.

त्यावेळी महाविकास आघाडीतून पन्नास खोके-एकदम ओकेचा नारा खूप गाजला होता. घोडेबाजारातून हे सरकार अस्तित्वात आल्याचा आरोप करण्यात आला होता. देशात इतर राज्यातही असाच प्रकार झाला. त्यामुळे राजकारण आणि राजकारण्यांविषयी जनतेच्या मनात सुप्त नाराजी दिसून येत होती. राजकारण हा चर्चेचा नाही तर तिटकार्‍याचा विषय ठरत होता. लोकसभेत जनतेने महाविकास आघाडीला भरभरून मतदान केले होते. तर आता विधानसभेला अपक्ष डोईजड ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे पुन्हा एकदा घोडेबाजाराची शक्यता वर्तवण्यात येत होती.

पण यावेळी बहुमत पूर्णपणे महायुतीच्या बाजूने झुकले. महाविकास आघाडीचा सुपडा वाजला. या नवीन अपडेटमुळे एक मोठी घडामोडी घडली. यावेळी आमदारांची पळवापळवी अथवा हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरजच जनतेने पडू दिली नाही. महायुतीच्या बाजुने मतदारांनी कौल दिला. यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी कुणाचा टेकू घेण्याची गरज राहिली नाही. महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग प्रशस्त झाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;