Wadala Election Result 2024 LIVE Updates : महाराष्ट्रात भाजपचा पहिला विजय निश्चित, सलग 9 व्यांदा बनणार आमदार
Wadala Election Result 2024 LIVE Updates : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाचे कौल हाती आले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत महायुतीने सत्तेसाठी लागणारी मॅजिक फिगर गाठली आहे. महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि सलग नवव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले भाजप नेते कालिदास कोळंबकर हे निवडणुकीतील पहिल्या विजयाची नोंद करण्याची तयारी करत आहे.
बातमी अपडेट होत आहे…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List