Bandra East Election Result 2024: सहानुभूतीची लाट झिशान सिद्दीकींना तारणार की ठाकरे बालेकिल्ला परत बळकवणार? ‘मातोश्री’च्या अंगणात गुलाल कोणाचा?

Bandra East Election Result 2024: सहानुभूतीची लाट झिशान सिद्दीकींना तारणार की ठाकरे बालेकिल्ला परत बळकवणार? ‘मातोश्री’च्या अंगणात गुलाल कोणाचा?

Bandra East Election Result 2024 LIVE Updates : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मुंबईतील हायव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.

मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी पुन्हा रिंगणात उतरले होते. तर महाविकासआघाडीकडून ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांना रिंगणात उतरवलं होतं. तसेच मनसेकडून तृप्ती सावंत मैदानात उतरल्या होत्या. वांद्रे पूर्व मतदारसंघातील लढत ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान याच मतदारसंघात आहे. त्यामुळे मातोश्रीच्या अंगणात गुलाल कोणाचा असा प्रश्न कायमच उपस्थितीत होत असतो. २०१९ मध्ये या मतदारसंघातून झिशान सिद्दिकी विजयी झाले होते. झिशान सिद्दिकी यांनी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला होता. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाकरे परत मिळवणार का, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;