Mahim Assembly Election Results 2024 : माहीममध्ये हायव्होल्टेज लढत ! अमित ठाकरे, महेश सावंत की सदा सरवणकर, कोणी मारली बाजी ?

Mahim Assembly Election Results 2024 : माहीममध्ये हायव्होल्टेज लढत ! अमित ठाकरे, महेश सावंत की सदा सरवणकर, कोणी मारली बाजी ?

विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात 20 तारखेला मतदान झाले असून आज मतमोजणी होऊन एकेका मतदारसंघाचे निकाल समोर येत आहेत. राज्यातील अनेक हाय व्होल्टेज लढतींपैकी एक मतदारसंघ होता माहीमचा. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते कारण तेथे सामना होता ठाकरे वि. ठाकरे या भावा-भावांमधील आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचंही तिकडे तगडं आव्हान होतं. मनसेचे अमित ठाकरे वि. शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत अशी बिग फाईट यंदाच्या निवडणुकीत पहायला मिळत आहे. अखेर या जागेचा निकाल समोर आला आहे.

मुंबईतील सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र, अमित ठाकरे हे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची आधी ओळख होती. मात्र मनसेचा उमेदवारा, तेही राज ठाकरेंचा पुत्र येथून निवडणूक लढवत असल्याने वेगळंच चित्र दिसलं. सुरुवातीला अमित ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे सांगितले जात होते. त्यानंतर ते भांडुपमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे बोललं जात होतं. अखेर अमित ठाकरेंसाठी माहीम विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यात आला. यानिमित्ताने ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरला, त्यामुळे सर्वांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या होत्या.

महायुतीकडून आमदार सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात

मनसेचा उमेदवार जाहीर होताच महायुतूतर्फेही उमेदावरा जाहीर झाला. खरंतर लोकसबा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला होता, त्यामुळे विधासभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराविरोधात महायुती उमेदवार नसेल अशी अटकळ होती. मात्र महायुतीमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला ही जागा आली आणि शिंदे गटाचे सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या जागेवरून नाट्य सुरू होते, मात्र सरवणकर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर अमित ठाकरेंसमोर सरवणककरांचे तगडे आव्हान होते.

तिरंगी लढत

तर मविआतर्फे जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला ही जागा आली. माहीम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दादर माहीम मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झाली, त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असे कधी होणार नाही, असे संजय राऊतांनी म्हटले होते. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली. अखेर या जागेचा निकाल समोर आला आहे.

माहिम विधानसभा निवडणूक निकाल 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;