विधानसभेच्या निकालापूर्वी मविआ, महायुतीत वेगवान घडामोडी, या अपक्ष अन् छोट्या पक्षांना फोनाफोनी, सीक्रेट बैठका

विधानसभेच्या निकालापूर्वी मविआ, महायुतीत वेगवान घडामोडी, या अपक्ष अन् छोट्या पक्षांना फोनाफोनी, सीक्रेट बैठका

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी येणार आहे. या निकालापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बैठका सुरु झाल्या आहेत. एक्झिट पोलचे निष्कर्ष आणि पक्षांनी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमधून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत दिसत आहे. सत्ता स्थापनेसाठी काही जागा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासून फोनाफोनी सुरु केली आहे. छोटे पक्ष आणि जे अपक्ष आमदार निवडून येऊ शकतात, त्यांना आपल्याकडे वळवणे सुरु केले आहे. तसेच सीक्रेट बैठकाही सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीने एकाच दिवसांत दोन सीक्रेट बैठका घेतल्या. तसेच निवडून येणारे आमदार फुटू नये म्हणून त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने आणण्याची व्यवस्था काँग्रेसने केले आहे. निवडून येणाऱ्या सर्व आमदारांना एका हॉटेलमध्ये किंवा अज्ञात स्थळी ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण २६ नोव्हेंबरपूर्वी राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे.

मुंबईत बैठकांचे सत्र

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यानंतर उद्धव यांच्या भेटीसाठी सर्व नेते एकाच वाहनातून मातोश्रीवर पोहोचले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर ही बैठक सुरू होती. महाविकास आघाडी लहान पक्ष आणि काही अपक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.

सत्तेत राहण्यासाठी कोणाबरोबरही जाऊ- प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे की, कोणतेही सरकार स्थापन झाले तरी ते बहुमत ज्यांच्याकडे होणार त्यांच्याकडे जाणार आहे. मग ते महाविकास आघाडी असो वा महायुती… आम्ही सत्तेत राहण्याचा निर्णय घेऊ.

शेकापच्या उमेदवारास फोन

सांगोल्यात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून फोन येण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांचे फोन आले असल्याची माहिती बाबासाहेब देशमुख यांनी दिली. शेकाप हा केडर बेस पक्ष (पार्टी ) असल्याने कार्यकर्त्यांची चर्चा करून महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा द्यायचा ते ठरवणार असल्याचे बाबासाहेब देशमुख यांनी म्हटले आहे.

शेतकरी कामगार पक्षाने ज्या ज्या वेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांना गरज भासली त्यावेळेस मदत केली मात्र सांगोल्यात महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने बाबासाहेब देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. निवडून आल्यानंतर सत्कार न स्वीकारता प्रत्येक गावाचं लीड पाहून जेवढे लीड तेवढे वृक्षारोपण करण्याचे अवाहन कार्यकर्त्यांना केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;