Mumbai Exit Poll 2024: मुंबई कोणाची? महायुती की महाविकास आघाडी, अ‍ॅक्सिसचा एग्झिट पोलमध्ये धक्कादायक निष्कर्ष

Mumbai Exit Poll 2024: मुंबई कोणाची? महायुती की महाविकास आघाडी, अ‍ॅक्सिसचा एग्झिट पोलमध्ये धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra Eelction Exit Poll Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. मतदान संपल्यानंतर एग्झिट पोलचे निष्कर्ष समोर आले. आता एग्झिट पोलचे विभागानुसार निष्कर्ष समोर आले आहे. त्यात मुंबई कोणाची? मुंबईकरांनी कोणाला पसंती दिली? ही माहिती आली आहे. यामध्ये ठाकरे बंधूंना धक्का बसत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जादू मुंबईत चालली नसल्याचे दिसून आले. मुंबईतील 36 जागांपैकी अनेक जागांवर महायुतीने वर्चस्व मिळाले आहे.

कोणाला किती जागा

अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार मुंबईतील 36 जागांपैकी 22 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होत आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 14 जागांवर विजय मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीशिवाय इतर कोणाताही उमेदवार विजय होत नाही. यामुळे राज ठाकरे यांचे चिंरजीव अमित ठाकरे यांचा पराभव होत असल्याचे या सर्व्हेमधून दिसत आहे. आता या ठिकाणी महायुती की महाविकास आघाडी हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. सर्व्हेतील दावा फोल ठरवून अमित ठाकरे विजयी होतात का? हे सुद्धा त्याच वेळी स्पष्ट होणार आहे.

अशी आहे टक्केवारी

लोकसभा निवडणुकीत मुंबईत महाविकास आघाडीचे वर्चस्व होते. परंतु विधानसभेतील निकाल वेगळेच येण्याची शक्यता एग्झिट पोलनुसार दिसत आहे. त्याचा फटका उद्धव ठाकरे यांनाही बसणार आहे. मुंबईतील 36 जागांपैकी 45 टक्के मत महायुतीच्या खात्यात जाताना दिसत आहे. तसेच 43 टक्के मत महाविकास अघाडीला मिळत आहे. तसेच बहुजन विकास आघाडीकडे दोन टक्के मते जात आहे. तो फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

दोन्ही शिवसेनेसाठी मुंबईचे महत्व

मुंबईचा निकाल उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे. मुंबई मनपावर अनेक वर्ष शिवसेनेचे वर्चस्व आहे. आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई मनपाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा कल मनपात असण्याची शक्यता आहे. मुंबईकर कोणत्या शिवसेनेला आपली पसंती देणार? हे आता 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;