Maharashtra Exit Poll 2024 Results : राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष, दबदबा कायम? एक्झिट पोलने कुणाला धक्का?

Maharashtra Exit Poll 2024 Results : राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष, दबदबा कायम? एक्झिट पोलने कुणाला धक्का?

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं.  2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षात फूट पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आता एक्झिट पोल हाती आले आहेत. पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 27 ते 50 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 18 ते 28 जाग मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 28 ते 47 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला 16 ते 35 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर 12 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना दोन ते आठ जागांचा अंदाजा पी मार्कने वर्तवला आहे.

दरम्यान एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन एक्झिटपोलमध्ये महायुतीच्या अधिक जागा दाखवण्यात आल्या आहेत.  तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 27 ते 50 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 18 ते 28 जाग मिळण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;