निवडणुकीतील भाजपचा खेळ संपला…नालासोपरातील प्रकरणानंतर संजय राऊत यांचा हल्ला

निवडणुकीतील भाजपचा खेळ संपला…नालासोपरातील प्रकरणानंतर संजय राऊत यांचा हल्ला

नालासोपारात भाजप आणि बहुजन विकास आघाडीत निर्माण झालेला राडाचे पडसाद उमटू लागले आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. त्यावर आता शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. भाजपचा खरा चेहरा उघड झाला, त्यांचा निवडणुकीतील खेळ संपला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले संजय राऊत

भाजपने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडलं ते कॅमेऱ्यासमोर आहे. खुलासे कसले करता. भाजपचा खरा चेहरा उघड झाला, त्यांचा निवडणुकीतील खेळ संपला. विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले. बहुजन विकास आघाडीचे लोकं घुसले. त्यांनी पैसे जप्त केले. पैसे फेकले तोंडावर. त्यांनी तावडेंना कोंडून ठेवलं. यावर भाजप काय खुलासा करणार आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

प्रत्येक मतदार संघात १५ ते २० कोटी रुपये

निवडणुकीत आचारसंहिता लागू होण्याआधी १५ ते २० कोटी रुपये प्रत्येक मतदारसंघात पोहोचले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, नाशिकला हॉटेलमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे पैसे पकडले. मुंबईत ठाण्यातून पैसे वाटपासाठी खास माणसांच्या नेमणुका झाल्या आहे. राम रेपाळे नावाचा शिंदेचा माणूस आहे. तो रात्री ११ नंतर पैसे घेऊन येतो. पैशाचं वाटप करून तो परत पोलीस बंदोबस्तात जातो. राम रेपाळे हे नाव लक्षात ठेवा. २३ तारखे नंतर त्याचं काय करायचं ते आम्ही पाहू. अशा १८ लोकांची नावे माझ्याकडे आहेत. पण विनोद तावडे स्वत: पैसे वाटतात हे आश्चर्य आहे. आमच्या बॅगा तपासतात. खिसे तपासतात. त्यांचं काय?

तावडेंकडे १५ कोटीपेक्षा जास्त रक्कम होती असं ऐकलं. त्यातील ५ कोटी रुपये स्थानिक आमदार क्षितीज ठाकूर यांच्या ताब्यात आहेत असं मी ऐकलं. त्याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सत्ताधारी पक्ष कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवत आहे हे कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यावर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे बोलणार आहेत.

माझ्याकडे तीच माहिती. तावडेंची माहिती महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांना दिली. तावडे भविष्यात आपल्याला जड होतील. हा बहुजन समाजाचा चेहरा आहे. राष्ट्रीय महासचिव आहे. राज्यांची काही सूत्रे आहेत. मोदी आणि शाह यांच्या जवळचा माणूस आहे. त्यांना पकडून देण्यासाठीच भाजपमध्येच कारस्थान झालं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;