पैशांचं बंडल सापडल्यानंतर ठाकूर पिता-पुत्र आणि तावडेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली, आता पुढे काय?

पैशांचं बंडल सापडल्यानंतर ठाकूर पिता-पुत्र आणि तावडेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली, आता पुढे काय?

मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना नालासोपाऱ्यातील विवांत हॉटेलमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजप उमेदवार नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक आणि विनोद तावडे हे शहरातील विवांत हॉटेलमध्ये भेटले. यावेळी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर हे विवांत हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसह पोहोचले. हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांना विवांत हॉटेलमध्ये घेरलं. यावेळी मोठा तमाशा झाला. विनोद तावडे पैशांच्या वाटपासाठी 15 कोटी रुपये घेऊन आले, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. क्षितीज ठाकूर यांनी पैशांचे बंडल देखील यावेळी दाखवले. तसेच विनोद तावडे यांच्याकडे डायरी आणि लॅपटॉपदेखील असल्याचा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला. जवळपास साडेतीन तास विवांत हॉटेलमध्ये मोठा गोंधळ झालेला बघायला मिळाला. यानंतर हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. पण ही पत्रकार सुरु असतानाच निवडणूक आयोगाचे आदेश आले आणि ती पत्रकार परिषद तिथेच थांबवण्यात आली. हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर हे दोन्ही नेते उमेदवार असल्याने त्यांना पत्रकार परिषद घेता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं. त्यामुळे ती पत्रकार परिषद तिथेच थांबली आणि ठाकूर पिता-पुत्र हॉटेलमधून बाहेर पडले.

हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?

“गेले काही दिवस नालासोपाऱ्यात परिवर्तन वगैरे बोलत आहेत. खरंतर तावडे साहेब तुमच्या भाजपच्या नेत्यांचा अपमान करत आहेत. वसई तालुक्त्यातील आमचं प्रतिनिधित्व विष्णू सावरा यांनी केलं. ते पालकमंत्री होते. सावरा आणि खासदार वनगा साहेब आमचं नेतृत्व पर्यंत करत होते. २००९पर्यंत रामभाऊ नाईक यांनी नेतृत्व केलं. ते केंद्रात मंत्री होते”, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.

“आज भाजपच्या काही मित्रांनी सांगितलं की तावडे साहेब माझे मित्र आहेत. क्षितीज ठाकूर त्यांना काका बोलतो. तावडे साहेब तुम्ही एका सर्व्हेत होता. त्यामुळे नेते आले नाही, असं सांगायला हवं होतं. काशाला आले. डायऱ्या सापडल्या. एकाच रुममध्ये १० लाख रुपये होते. हे पैसे कुणाचे. आता हितेंद्र ठाकूरचे होते म्हमून सांगू नका. असं असेल तर मी घेऊन जातो. मला उपयोगी पडतील कामधंद्याला”, असं हितेंद्र ठाकूर मिश्किलपणे म्हणाले.

विनोद तावडे काय म्हणाले?

यावेळी विनोद तावडे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “निवडणूक आचारसंहितेच्या विषयाच्या दिवशी वोटिंग मशीनची माहिती दिली. आचारसंहितेचा भंग नाही. वास्तव आम्ही सांगितलं. हितेंद्र आप्पांनीही सांगितलं. आता निवडणूक आयोग आणि पोलीस काय ते करतील. कार्यकर्त्यांना मतदान कसं करायचं हे सांगण्यासाठी आलो होतो. निवडणूक आयोगाने आरोपांची चौकशी करावी”, अशी भूमिका विनोद तावडे यांनी मांडली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;