Uddhav Thackeray : “मिंध्या तु मर्दाची औलाद असलास…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना भरसभेत आव्हान

Uddhav Thackeray : “मिंध्या तु मर्दाची औलाद असलास…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना भरसभेत आव्हान

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. प्रचारासाठीचे शेवटचे अवघे काही तास बाकी आहेत.अशात मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी आणि आपणच कसे पुढील 5 वर्षांत महाराष्ट्राच्या विकासासाठी योग्य आहोत हे दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे अनेक जाहीर सभांमधून एकमेवकांवर आरोप-प्रत्यारोपांसह सडकून टीका करत आहेत. तसेच एकमेकांना ओपन चॅलेंजही देत आहेत. असंच एक आव्हान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

उद्धव ठाकरेंचं शिंदेना आव्हान काय?

“काल मी मिंध्यांना ठाण्यात आव्हान दिलं होतं, आज मी तुमच्या साक्षीनं देतोय. मिंध्या जर तु मर्दाची औलाद असलास, वाटत तर नाहीच. तर तु तुझ्या वडिलांचा फोटो लावून नावाने मैदानात ये आणि मग मतं नाही तर जनतेची जोडी खा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बीकेसीत महाविकास आघाडीच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांनी या सभेतून एकनाथ शिंदेंना हे आव्हान दिलं.

उद्धव ठाकरे ठाण्यात काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी 16 नोव्हेंबरला ठाण्यातील सभेतून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोच्या वापरावरुन शिंदे गटावर टीका केली होती. “बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे बेनरवर फोटो लावता. मर्दाची खरी अवलाद असाल तर स्वतःच्या वडिलांचे फोटो लावा आणि निवडणुका जिंकून दाखवा”,असं आव्हान ठाकरेंनी शिंदेंना दिलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;