मोठी बातमी! अभिनेता गोविंदाची तब्येत अचानक बिघडली, रोड शो अर्धवट सोडून मुंबईला रवाना

मोठी बातमी! अभिनेता गोविंदाची तब्येत अचानक बिघडली, रोड शो अर्धवट सोडून मुंबईला रवाना

अभिनेता गोविंदा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आज महायुतीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. मात्र पाचोऱ्यामध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर रोड शो सुरू असतानाच काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं तसेच गोविंदा यांच्या ज्या पायाला गोळी लागली होती, तो पाय देखील दुखत असल्यानं त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते तातडीनं मुंबईकडे रवाना झाले.

दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहा आणि महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. मी किशोर पाटील यांना शुभेच्छा देतो. किशोर पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. देशात होणाऱ्या प्रगतीसोबत आहेत. प्रार्थना करतो की किशोर पाटील हे विजयी होतील.  माझी तब्येत ठीक नसल्याने मी इथून निघत आहे, मी इथल्या जनतेची माफी मागतो.  इथल्या लोकांनी मला भरभरू प्रेम दिलं आहे.  माझी तब्येत ठीक नाही मला गोळी लागलेली होती आणि आता सध्या छातीमध्ये देखील दुखत आहे. रिस्क नको म्हणून मी आता हा दौरा अर्धवट सोडून पुन्हा मुंबईला जात आहे.

किशोर पाटील विजय झाल्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी येईल, नक्कीच महायुती विजयी होईल. देशाला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सितारे पुढे आले आहेत. माझ्यावर महाराष्ट्राच्या भूमीची कृपा राहिलेली आहे.  संपूर्ण जगाने नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्राकडे बघायला सुरुवात केली, नक्कीच राज्याची प्रगती होत आहे. मी त्या शिवसेनेला देखील माझी सेवा दिलेली आहे. मी शिवसेनेसोबत जोडलेलो आहे. आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहे, असं अभिनेता गोविंदा याने म्हटलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;