Raj Thackeray MNS Manifesto: 2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही…राज ठाकरे यांनी कोणत्या गोष्टीचा केला उल्लेख

Raj Thackeray MNS Manifesto: 2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही…राज ठाकरे यांनी कोणत्या गोष्टीचा केला उल्लेख

Raj Thackeray MNS Manifesto: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा फक्त जाहीरनामा नाही तर त्यात केलेल्या घोषणा कशा पद्धतीने पूर्ण करणार? हे सुद्धा दिले आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्ष झाले आहे. या १९ वर्षांत मनसे काय, काय केले? त्याची माहिती दिली आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटबाबत कोणी विचारले नाही

अनेकांनी आम्ही काय करू एवढंच दिलं. आम्ही काय करू आणि कसं करू ते जाहीरनाम्यात टाकलं आहे. मी २००६ रोजी राज्याची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईल सांगितलं होते. ती २०१४ला आली. पण या काळात मला हिणवलं गेलं. कुत्सितपणे प्रश्न विचारलं गेलं. २०१४ला ती प्रसिद्ध झाली. त्यावेळी युती तुटली होती. पण गेल्या दहा वर्षात ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे, कशी केली वगैरे कुणी मला विचारलं नाही. आज जाहीरनामा प्रसिद्ध करताना ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी टाकल्या आहेत. कारण विषय आणि प्रश्न बदलले नाही. त्यामुळे हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे.

राज ठाकरे म्हणाले की, आता जाहीरनाम प्रसिद्ध करताना आमच्या अनेक लोकांना मी येथे बोलावले नाही. कारण ते मतदारसंघात प्रचार करत आहे. त्यामुळे त्यांना त्रास दिला नाही.

कसा आहे जाहिरनामा

जाहिरनाम्यात पहिला सेक्शन आहे, त्यात मूलभूत गरजा आणि जीवनमान  दिला आहे. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. पुढच्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा सेक्शन, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेनेच आपण जाहीरनामा ठेवतो. इतर पक्षांनी जाहीरनामे केले. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीचे लोकांनी माझ्या पेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असे जाहीरनाम्याची अंमलबजावणीसंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;